Home अकोले अकोले : शेंडी ग्रामस्थांकडून भंडारदरा धरणाचे प्रवरामाईला प्रसाद चढवत साडीचोळी अर्पण करून...

अकोले : शेंडी ग्रामस्थांकडून भंडारदरा धरणाचे प्रवरामाईला प्रसाद चढवत साडीचोळी अर्पण करून जलपूजन

भंडारदरा : भंडारदरा धरण यावर्षी ३ ऑगस्ट रोजीच तांत्रिकदृष्ट्या भरले असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांनी शेंडी ग्रामस्थांसह विधिवत जलपूजन करत प्रवरामाईला प्रसाद चढवत साडीचोळी अर्पण केली.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजेच पर्यटकांचं माहेरघर समजलं जातं. भंडारदऱ्याला निसर्गाचा फार मोठा ठेवा मिळालेला असून, ब्रिटीशकालिन भंडारदरा धरण ही याच परिसरात गेल्या ९३ वर्षापासून थाटात उभे आहे. या धरणाच्या जिवावरच आज हजारो आदिवासी बांधवांचा रोजगार आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाचेही आपण काहीतरी देणे लागतो हा उद्देश ठेवून भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे व त्यांच्या सहचारिणी राजूर गटाच्या जि. प. सदस्या सुनीताताई भांगरे तसेच शेंडी गावचे प्रथम नागरिक दिलीपराव भांगरे व त्यांच्या सहचारिणी संगीता भांगरे यांनी भंडारदरा धरण हे ज्या नदीवर बांधलेले आहे त्या प्रवरामाईच्या पाण्याची विधिवत जलपूजा करत साडीचोळी अर्पण केली. अशीच कृपा राहू दे, अशी प्रार्थना अशोकराव भांगरे, दिलीपराव भांगरे व शेंडी येथील व्यापारी व ग्रामस्थांनी प्रवरामाईस केली.

जलपुजनासाठी भंडारदरा येथील भाजपा नेते अशोकराव भांगरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, जि. प. सदस्या सुनीताताई भांगरे, माजी सरपंच संगीताताई भांगरे, संदीप डगळे, विठ्ठल बापू खाडे, दत्ता भांगरे, पप्पू बनसोडे, सोमा नावजी मधे, अनिल अवसरकर, सोपान अवसरकर, सचिन नेवासकर, शुभम काळे, अजित भांगरे, साहेबराव पंडित, राहुल घाटकर, स्वप्निल शहा, राजू राठोड, डॉ. ढोन्नर, आदेश जाधव, गणेश कोरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Website Title: Latest News Akole: Shedi Village Offering Offerings Of Sarisolai To The Bhandardara Dam By Shandi Villagers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here