Home अकोले अकोले: गडवाट-एक स्पंदन व उपासना फाऊंडेशन मुंबई यांचे वतीने खिरविरे परिसरातील विदयार्थ्यांना...

अकोले: गडवाट-एक स्पंदन व उपासना फाऊंडेशन मुंबई यांचे वतीने खिरविरे परिसरातील विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.

पिंपळगाव नाकविंदा : अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील खिरविरे परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिर्थाचीवाडी व धारवाडी येथील विदयार्थ्यांना गडवाट- प्रवास सहयाद्रिचा ग्रुपच्या वतीने तसेच उपासना फाऊंडेशन मुंबई या सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्यासह छत्र्या, सँडल, वॉटर बॉटल आदी साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडवाट ग्रुपचे सदस्य तथा पट्टाकिल्ला विकास मंडळाचे सदस्य संदेशभाऊ साळुंके तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय डगळे हे होते. यावेळी माजी उपाध्यक्ष रामदास डगळे, उपासना फाऊंडेशनचे सौरभ कासलकर, दिप्ती कासलकर, शिला कासलकर, केंद्रातील शिक्षक महादेव जाधव, श्रीमती. बच्छाव, श्री. भोजने, मुख्याध्यापक दिगंबर वाकळे, नरेंद्र राठोड, रवि डगळे आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी दिप्ती कासलकर यांनी मुलांना साहित्य घेऊन आनंदाने विरून न जाता आनंदाने अभ्यास करा अन मोठे व्हा. असे अवहान केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक दिगंबर वाकळे यांनी वाडी,वस्तीवरील या मुलांना आपण दिलेल्या शहरातील विविध प्रकारच्या वस्तुंचे आकर्षण पाहून त्यांच्या आनंददायी शिक्षणासाठी हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपक्रमशील मुख्याध्यापक दिगंबर वाकळे यांनी केले. तर उपक्रमशील शिक्षक नरेंद्र राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्यामुळे सवत्र आनंदाचे सुर दिसुन येत होते.

Website Title: Latest News Akole: Distribution Of School Material On Behalf Of Gadwat-Ek Spandan And Worship Foundation Mumbai.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here