Home अकोले अकोले : म्हैसवळण घाटातील रस्ता खचला; वाहतूक बंद

अकोले : म्हैसवळण घाटातील रस्ता खचला; वाहतूक बंद

अकोले : तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने अकोले ते टाकेद रस्त्यादरम्यान म्हैसवळण घाटातील रस्ता खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाचनई ते पेठेच्या वाडीच्या मधील डोंगरच खचल्याने त्याची सर्व माती, दगड, झाडे वाहून रस्त्यावर आल्याने हा रस्ताही बंद झाला आहे.

अकोले तालुक्याला गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. या पावसाने भात शेतीचे तर नुकसान केलेच; पण शेतीचे बांधही बऱ्याच ठिकाणी फुटले आहेत. तालुक्यातील अनेक फरशी पूल पाण्याखाली गेले. नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले आहे. काल सकाळी अकोले ते टाकेद दरम्यान असणाऱ्या म्हैसवळण घाटातील रस्ताच खचल्याने त्या मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.

हा रस्ता इगतपुरी हद्दीत खचला असल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले.पाचनई ते पेठेच्या वाडीच्यामध्ये असणारा एक डोंगरच खचला असून, त्याची सर्व माती, दगड, झाडी वाहून रस्त्यावर आली आहे. यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अकोले तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

Website Title: Latest News Akole : Road Lost In A Meadow; Traffic Stop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here