Home अकोले राजूर : दरड कोसळल्याने पेठेचीवाडीचा जनसंपर्क तुटला

राजूर : दरड कोसळल्याने पेठेचीवाडीचा जनसंपर्क तुटला

राजुर : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पावसामुळे पाचनई गावाच्या मागे दरड कोसळल्याने पेठेच्यावाडीचा जनसंपर्क तुटला आहे. याबाबत अकोले तहसीलला माहिती देऊनही कोणताही अधिकारी अद्याप फिरकला नाही. पाऊस असाच सुरु राहिल्यास तेथील काही घरांना धोका निर्माण होऊ शकतो.

गेली चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अकोले तालुक्यात हाहाकार माजविला असून जवळपास सर्वच लहान-मोठी धरणे तुडुंब भरली आहे. प्रवरा, मुळा, कृष्णावंती नद्या दुधडी भरून वाहात आहेत. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून मुळा नदीचा कोतुळजवळ विसर्ग ५२ हजार क्युसेक्स इतका होता. या मुसळधार पावसामुळे पेठेचीवाडी या गावाचा पाचनई गावाच्या मागील बाजूस दरड कोसळल्याने पेठेचीवाडी या गावाचा जनसंपर्क तुटला आहे. येथील ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक भारमल यांनी सदर घटनेची अकोले तहसील येथे सकाळी दूरध्वनीद्वारे संपर्क करूनही कोणीही अधिकारी इकडे फिरकला नाही. तसेच पाऊसाचा जोर असाच सुरु राहिल्यास येथील काही घरांना धोका असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीद्वारे बोलताना ग्रामस्थांनी सांगितले.

Website Title: Latest News Rajur: Pethchiwadi Public Relations Breaks Down Due To Crackdown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here