Home अकोले वैभव पिचड एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील: सीताराम गायकर

वैभव पिचड एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील: सीताराम गायकर

अकोले: अकोले विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील मुळा, प्रवरा, आढळा व पठार भागात शेतकरी राजा पाण्यासाठी जी मागणी करत होता. ती मागणी पूर्ण करण्यात पिता पुत्रांनी यश मिळविल्याने त्यांनी अकोले तालुका जलमय केला आहे.

त्यांना आजही तालुक्यातील सर्व भागात जलपुरुष या नावानेच ओळखत असून या निवडणुकीत आमचे युतीचे उमेदवार लाखाच्या मताधिक्क्याने नक्कीच विजयी होतील असा विश्वास अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी पत्रकारांशी संवाद करतांनी व्यक्त केला.

अकोले तालुक्यातील विविध भागांमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ व कार्यकर्त्यांच्या भेटी गाठींवर  भर देत असताना कार्यकर्ते स्वतःहून या तालुक्यातील चाळीस वर्षाचा इतिहास हा जलपुरुष माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळेच आज सर्व भागातील शेती बारमाही झाली.

या तालुक्यातील गावांगावात घराघरात पिचड यांनी योगदान दिले ते योगदान सर्वाना परिचित असून निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असली तरीही मतदारराजाच्या भेटीनंतर विकासाच्या मुद्द्यावर व निवडणुकीत आपल्या उमेदवाराने लक्ष केंद्रित केले असून तालुक्यातील पाच वर्ष जो बॅकलोक राहिला तो पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात नक्कीच भरून काढतील. त्यांच्या गावागावातील सभा व जेष्ठ युवकांच्या प्रतिसादामुळे आजही ते प्रत्येकाच्या मनात विकासाचे मॉडेल तयार करून या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी होतील असा आत्मविश्वास गायकर यांनी व्यक्त केला.

Website Title: Latest news speech of Sitaram gaykar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here