Home अकोले अकोले पंचायत समितीत पदाधिकारी केबिनमध्ये दारू पार्टी

अकोले पंचायत समितीत पदाधिकारी केबिनमध्ये दारू पार्टी

अकोले: विधानसभा निवडणुकीमुळे एकीकडे आदर्श आचारसंहिता पालनाचा निवडणुक आयोगाचा आदेश आहे तर दुसरीकडे तिचा भंग झाला आहे. याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

शिवसेनेअंतर्गत असणारा वाद निवडणूक काळात उफाळून आला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख व त्यांचे विरोधक असा वाद रंगात आला असतानाच पंचायत समितीच्या पदाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये ३ तारखेला गुरुवारी दारू पार्टी झाली. तिची चौकशी करावी अस्जी मागणी करणारे निवेदन तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिली आहे. पंचायत समितीच्या एका पदाधिकार्याच्या केबिनमध्ये दारू पार्टी झाली हि पार्टी होत असताना केबिनमधील लाईट बंद करण्यात आली होती. त्या पार्टीसाठी संगमनेर तालुक्यातील काही लोक होते. व उर्वरित तालुक्यातील काही लिक होते. ज्या पंचायत समितीतून कार्यालयातून अकोले तालुक्याच्या विकास कामांची धोरणे आखली जातात अशा लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या होणार असतील तर अकोले तालुक्यातील जनता सहन करणार नाही असा इशारा त्यात देण्यात आला.

सध्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून आदर्श आचारसंहिता चालू असताना पंचायत समितीमध्ये दारू पार्टी कशा काय होतात याची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तसे न घडल्यास येत्या गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.  

Website Title: Latest News Akole panchayat samiti Party

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here