Home अकोले राजुर: सर्वोदयच्या विद्यार्थ्यांची विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

राजुर: सर्वोदयच्या विद्यार्थ्यांची विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

राजुर: अहमदनगर जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा नुकत्याच जिल्हा क्रीडा संकुल,वाडिया पार्क, अहमदनगर येथे पार पडल्या.  या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले. 17 वर्षाखालील मुले 66 किलो खालील वजन गटात ऋषीकेश कुदनर,81 किलो वजनगटात अभिनंदन चमकले,  19 वर्षाखालील मुले 50 किलो खालील वजन गटात नचिकेत हंगेकर,45 किलो खालील वजनगटात देशमुख सोनु  66 किलो खालील वजन गटात शुभम पाटील 14 वर्षाखालील मुले 30  किलो खालील वजन गटात प्रतीक दातखिळे  यानी प्रथम क्रमांक संपादन करून त्यांची  इंदापूर जि.पुणे येथे होणाऱ्या विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याना प्रा. विनोद तारू यांनी मार्गदर्शन केले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख,सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल. पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Website Title: Latest News Svm Rajur Judo competition 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here