Home अकोले माझ्या समोर असलेल्या उमेदवाराकडे विकासाची दूरदृष्टी नाही: वैभव पिचड

माझ्या समोर असलेल्या उमेदवाराकडे विकासाची दूरदृष्टी नाही: वैभव पिचड

अकोले :- विरोधी राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आम्ही राष्ट्रवादी पक्षात असताना शरद पवार यांना शिव्या शाप देत होता,अशी घणाघाती टीका अकोलेचे माजी आ.वैभव पिचड यांनी डॉ.किरण लहामटे यांचे नाव न घेता केली.

अकोले तालुक्यातील राजूर येथील बाजारतळ  चौकात महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. आ.पिचड पुढे म्हणाले की, सत्तेत नसल्यामुळे गत पाच वर्षांत विकासकामांना निधी उपलब्ध झाला नाही. शेजारील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. मात्र अकोले तालुक्याला जाणीवपूर्वक निधी पासून डावलले गेले.त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मला भाजपात प्रवेश करावा लागला, असे ही पिचड म्हणाले. माझ्या समोर असलेल्या उमेदवाराकडे विकासाची दूरदृष्टी नाही. त्यामुळे अकोलेकर जनता त्यांना स्विकारणार  नाही, असे ही पिचड म्हणाले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड आपल्या भाषणात म्हणाले की,ज्या देशाने मोदींना स्वीकारले आपण त्यांना स्वीकारले आहे.तालुक्यातले काही नेते जे यापूर्वी मोदींचा जयजयकार करीत होते,आज त्यांच्याच विरोधात बोलतांना आपण पाहतोय.मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे आपला देश खऱ्या अर्थाने स्वावलंबी व बलाढ्य झाला असल्याची कबुली पिचड यांनी दिली.

जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ आपल्या भाषणात म्हणाले की, आपली लढाई ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी नसून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराशी आहे,असे ते म्हणाले.आमच्या उमेदवाराने पक्ष बदलला असं म्हणनाऱ्यांनी किती पक्ष बदलले,हे नागरिकांना माहीत आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचा उमेदवार वैभव पिचड हा एक लाख मताधिक्यांनी निवडून येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रचार सभेसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर, मिनानाथ पांडे,कैलासराव वाकचौरे, गुलाबराव शेवाळे,मच्छीन्द्र धुमाळ, गोरख मालुंजकर,प्रकाश मालुंजकर,जयश्री सावंत, ईश्वर वाकचौरे,मधुकराव नवले, भाऊसाहेब वाकचौरे  आदी उपस्थित होते.

Website Title: Latest News Rajur Sabha Vaibhavrao Pichad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here