अकोले पंचायत समितीत दारू पार्टीचा आरोप खोटा: मेंगाळ
अकोले: लोकशाहीच्या दालनात दारू पार्टी झाल्याचा आरोप निखालस खोटा आहे. उलट पंचायत समितीच्या दालनात आम्ही विकासाची गाणी गातो. तर अवैध धंदे करणार्यांनी शिव्या देण्याचा उद्योग बंद करावा आरोप करणाऱ्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे अकोले तालुका पंचायत समितीचे उप सभापती मारुती मेंगाळ यांनी म्हंटले आहे.
पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये दारू पार्टीचा चुकीचा आरोपांचे मेंगाळ यांच्याकडून तीव्र शब्दात खंडन केले आहे. राजकीय व सूडबुद्धीने आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करावे पुरावे सादर करावे अन्यथा त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची फिर्याद दाखल करणार असल्याचा इशाराही त्यात त्यांनी दिला आहे.
गेली तीन वर्षात पंचायत समितीच्या माध्यामातून तीन वर्षात चांगली कामे झाल्याने सर्वत्र कौतुक होत असताना अशा विग्न संतोषी लोकांना चांगले काम पहावत नसल्याने अशा प्रकारचे आरोप केले जात आहे. तालुक्यात कोण कोण बेकायदेशीर धंदे करून वेगवेगळ्या माध्यमातून आपली पोळी भाजत आहे हे तालुक्यातील जनतेला माहित आहे. अशा पप्रकारचे आरोप करणार्यांनी या घटनेचे पुरावे सादर करावेत अन्यथा या आरोपांमधून पंचायत समितीचे पदाधिकारी अधिकारी संपूर्ण प्रशासनाची बदनामी झाल्याने आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा फिर्याद दाखल करणार असल्याचे मेंगाळ यांनी जाहीर केले.
Website Title: Latest News Akole panchayat samiti aarop