Home अकोले अकोले: छेडाछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

अकोले: छेडाछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

अकोले: सततच्या होणाऱ्या छेडाछाडीला व शारीरिक  त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीने विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. हि घटना तालुक्यातील डोंगरवाडी येथे बुधवारी घडली. या प्रकरणी आरोपीला राजूर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, डोंगरवाडी येथील शोभा सीताराम लांडे वय १९ व लहू रामा भांगरे (वय १९ केळी रुम्हन्वाडी) हे दोघेही पिंपरकने येथील विद्यालयात १२ वि मध्ये शिकत होते. दरम्यान लहू भांगरे याने अनेक वेळा शोभा लांडे या विद्यार्थिनीची छेडाछाड केली होती. बुधवारी त्याने पुन्हा एकदा त्याने त्या विद्यार्थिनीची चेद काढून शाळेच्या आवारातच तिला मारहाण केली होती. या घटनेनंतर डोंगरवाडी येथे घरी जाताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत शोभा हिने उडी मारू आत्महत्या केली.

याप्रकरणी मयात शोभाचा भाऊ राजेंद्र लांडे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांनी आरोपी लहू भांगरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.  

Website Title: Latest News Suicide student in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here