Home अकोले अकोले: कळसमध्ये एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली

अकोले: कळसमध्ये एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली

अकोले: अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी हायवेवरील कळस बुद्रुक येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी हायवेवरील दुकानावर लक्ष केंद्रित करून चोरी करण्यात यशस्वी झाले. दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना कळस येथे घडली आहे.

एकूण तीन ते चार तरुण चोरट्यांनी तोंडावर मफलरीने बांधून हा पराक्रम केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.फोडलेल्या दुकानांमध्ये दोन मेडिकल, दोन कृषी सेवा केंद्र, एक किराणा दुकान आहे. पवनपुत्र मेडिकल, सोमेश्वर मेडिकल, प्रतिक कृषी सेवा केंद्र, शुभम कृषी सेवा केंद्र अरिहंत किराणा अशा चोरी केलेल्या दुकानांची नावे आहेत. सदर दुकान मालकांनी अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती होताच अकोलेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे,उपनिरीक्षक दीपक ढोमने यांनी घटनास्थळी धाव घेतली व नगर येथील श्वान पथक पाचारण करून तपास मोहीम राबविण्यात आली.  

Website Title: Latest News Shop theft in Kalas 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here