Home अकोले तळेगाव व परिसरातील जनतेची घोर फसवणूक,संगमनेर विधानसभेच्या प्रचारात निळवंडे ची टूम नको

तळेगाव व परिसरातील जनतेची घोर फसवणूक,संगमनेर विधानसभेच्या प्रचारात निळवंडे ची टूम नको

तळेगाव व परिसरातील जनतेची घोर फसवणूक,संगमनेर विधानसभेच्या प्रचारात निळवंडे ची टूम नको: निळवंडे वंचित शेतकरी संघटना 
 “तळेगाव व परिसरातील निळवंडे पाट पाण्यापासून वंचित राहणाऱ्या ११ गावांच्या मनातील खंत”
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसारलाय ,आणि विधानसभेच्या निवडणूकांचा जोर वाढत चाललाय. संगमनेरात ही विधानसभेच्या निवडणूकांमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. सोशल मीडियात ही जो तो ज्याच्या त्याच्या परीने वातावरण तापवायचा प्रयत्न करतोय .परंतु जनतेच्या प्रश्नांवर कुणी बोलायलाच तयार नाहीय. फक्त एक दुसऱयांवर चिखलफेक सुरू आहे. जो तो संगमनेरच्या परिसरात निळवंडे चा फायदा घेऊन सोपस्कर राजकारण करतोय .परंतु निळवंडे विषय हा संगमनेर विधानसभेसाठी प्रचाराचा मुद्दा कसा काय होऊ शकतो हे जनतेला समजावून सांगण्यास कुणी तयार नाहीय. संगमनेरच्या किती भागाला निळवंडे प्रकल्पाचा फायदा होणार आहे,हे निळवंडे ची टूम वाजवणार्यांनी जनतेला समजून सांगावे. प्रत्येकवेळी निवडणूक जवळ आली की निळवंडे आणि दुष्काळी भागाच समीकरण बसतं .प्रत्येकजण निळवंडे वरच जनतेला आपल्यापरीने भूलथापा देत असतो .मग जर निळवंडे मुळे संगमनेर तालुक्या चा भलं होणार असेल तर नक्की संगमनेरच्या भागाला निळवंडेचा  नक्की किती फायदा होणार हे जनतेला समजून सांगितलं पाहिजे.
संगमनेर तालुका तसा दुष्काळी ,त्यात तळेगाव निमोण गट अतिदुष्काळी आणि ४०  वर्षांपासून या भागाची सर्वच राजकारणी चेष्टा करताहेत ,आपल्यापरीने भुलवताहेत. संगमनेर तालुक्यातील काही गावे वगळता संपूर्ण तळेगाव गट व परिसराला या निळवंडे प्रकल्पाचा काडीचाही फायदा नाही. दुष्काळी परिसराचा केंद्रबिंदू असणाऱ्या तळेगाव पासून कालवा 7 ते 8 किलोमिटर दूर आहे. तळेगावच्या  अगदी अल्पसा परिसर म्हणजे फक्त 84 हेक्टर इतक्या क्षेत्राचा निळवंडे च्या लाभक्षेत्रात समावेश आहे .तळेगाव निमोण गटातील  तळेगाव ची  5 गावे,तिगाव,करूले,पारेगाव बु व खुर्द ,चिंचोली,सोनोशी,नान्नज,वडझरी बु व खुर्द साहित १४ गावे या या पाण्यापासून वंचित राहणार आहे. म्हणजे तळेगाव व निमोण परिसर या पाण्यापासून वंचित राहणार आहे  याचं तळेगाव च्या परिसरात निळवंडे चा गजर करून  पाण्याच फक्त गाजर दाखवलं जातंय. मग जर एवढा मोठा परिसर या पाण्यापासून वंचित राहणार असेल तर सर्वच उमेदवारांनी तळेगाव गटाला वळसा घालून जाणारा निळवंडे कालवा संगमनेर तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्यां या परिसराला सुजलाम सुफलाम कसा करणार हे मते मागणार्यांनी समजून सांगावे. मुळात ज्या दुष्काळी परिसरासाठी या प्रकल्पाची निर्मिती झाली त्यातील अल्पसा भाग सोडून इतर सर्व परिसराला या प्रकल्पाचा काडीचाही फायदा नाहीय हे सर्वच नेते जाणत असून तरीसुद्धा कायमच तळेगावमध्ये निळवंडेचा गजर करून सामान्य जनतेची दिशाभुल केली जात आहे. निळवंडे साठी हे केलं ते केलं म्हणणार्यांनी तळेगाव आणि परिसराला न्याय मिळवून देण्यासाठी काय करणार आहात याचा खुलासा केला पाहिजे. जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपले आहेत. राजकारण करणाऱ्यांनो सावध व्हा..!तुमच्या भूलथापांना दुष्काळी निळवंडे पासून वंचित शेतकरी बळी पडणार नाही. सामान्य जनतेला फसवायचे दिवस आता संपलेत. तेव्हा सर्वानीच तळेगावमध्ये येऊन जनतेला येड्यात काढण्याचे धंदे थांबवा. जर कुणी निळवंडेचा गैरफायदा घेऊन जनतेला फसवायचा प्रयत्न केला तर तर वंचित परिसरातून याचे चोख प्रतिउत्तर मिळेल याची नोंद प्रचारकांनी घ्यावी.अशी प्रतिक्रिया दुष्काळी गावातील लोक व्यक्त करत आहे.
निळवंडे पासून वंचित असणाऱ्या सर्व गावातील सुजाण नागरिकानो जर कुणी निळवंडेवर गावात येऊन निळवंडे ची टूम वाजवली त्याला त्याला “आमचं काय….?” हा प्रश्न विचारा योग्य उत्तर न मिळाल्यास त्याला हाकलायच काम आपन सर्वानी करायचंय. निळवंडे वंचित शेतकरी पेटून उठलेले आहेत. तुमच्या भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही . निळवंडे वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱयाच्या पाठीशी आम्ही नक्की च उभे राहू परंतु या प्रश्नावर राजकारण करणाऱ्याची गय केली जाणार नाही. जो आमचे प्रश्न सोडवण्यासाठी  भक्कम vision घेऊन जनतेत येईल त्याला नक्कीच प्रतिसाद मिळेल .निळवंडे वंचित शेतकरी संघटना या साठी प्रयत्न करीतच आहे. आता निळवंडे प्रश्नावर राजकारण करण्याचे दिवस संपलेत. सर्व निळवंडे वंचित शेतकऱयांना आवाहन आहे आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचेय. या सर्वच राजकारणी दृष्ट शक्तींना रोखा आणि आपल्याला पाणी कसं देणार हा जाब स्टार प्रचारकाना विचारा.  या प्रश्नावर राजकारण करील त्याची गय केली जाणार नाही. असे आवाहन निळवंडे वंचित शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे
शेवटी एकच आहे
पाणी द्या ……..मत घ्या.
Website Title: Latest News Nilwande Dam 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here