Home अकोले अकोलेत श्रीगोंदा पॅटर्न राबवून पिचडांचा करणार पराभव: फाळकेंची घोषणा

अकोलेत श्रीगोंदा पॅटर्न राबवून पिचडांचा करणार पराभव: फाळकेंची घोषणा

अकोले: एकीकडे १२ विरुद्ध 0 अशी निकालाची शेखी मिरवली जात आहे. तरी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीगोंदा पॅटर्न राबवून वैभव पिचड यांचा पराभव करण्यात येईल असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी फाळके बोलत होते. अध्यक्षस्थानी बबनराव तिकांडे होते. पक्षाची ज्यांनी दीर्घकाळ ज्यांनी सूत्र सांभाळली त्यांनी पक्षाला दगा दिल्याची भावना व्यक्त करून फाळके यांनी पिचड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. लवकरच पक्ष पदाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाईल. अशोकराव भांगरे, किरण लहामटे, सतीश भांगरे, मधुकर तळपाडे आदींशी आम्ही संपर्क ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. पिचड नावाच्या शक्तीविरुद्ध एकच उमेदवार आम्ही मतदार संघासाठी देणार आहोत असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी वज्रमुठ बांधावी आणि याठिकाणी पक्षाचा उमेदवार विजयी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ. लहामटे म्हणाले, पिचड विरोध काल होता, आज आहे आणि उद्याही राहणार आपण अकोले विधानसभा मतदार संघाचा पूर्ण दौरा केला आहे. मात्र आता जो मान्यवर निर्णय देतील त्याला आपला पाठींबा राहील. उमेदवारी दिली तरी तुमचा आणि नाही दिली तरी तुमचाच असे सांगून डॉ. लहामटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Website Title: Current Political News defeat of the Pichad Phalke

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here