Home अकोले अकोले: जैन मंदिरात धाडसी चोरी

अकोले: जैन मंदिरात धाडसी चोरी

कोतूळ: कोतूळ येथील भर चौकात असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिरात चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास दरवाजे तोडून दानपेटीतील सुमारे साठ हजार रुपये व साडे तीनशे ग्राम चांदीचे शिक्के लंपास केले आहेत. विशेष म्हणजे दीड महिन्यात कोतूळात हि तिसरी चोरी आहे. कोतूळ जैन मंदिर चोरी प्रकरणी मंदिर विश्वस्त सुनील शहा, प्रवीण शहा, सुभाष देसाई, महेंद्र शहा यांनी अकोले पोलीस निरीक्षक यांच्याकडे फिर्याद दाखल केली आहे.

गेल्या चार वर्षापासून कोतूळ गाव चोरांना आदन दिल्याचा प्रकार कोतूळ गाव अनुभवत आहे. गेल्या चार वर्षात कोतूळ गावात मोठ्या संखेने चोऱ्या झाल्या आहेत. तपास होत नसल्याने चोरांनी गुरुवारी पहाटे कोतूळ शहरातील मुख्य चौकातील पार्श्वनाथ जैन मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून दान पेटीतील सुमारे साठ हजार रुपये व चांदीची १० ग्राम वजनाची पस्तीस नाणी लंपास केली.

कोतूळ शहरात गेल्या चार वर्षापासून असंख्य चोऱ्या झाल्या. गतवर्षी एका वृद्ध माजी सैनिकाच्या मुलीच्या गळ्यातील गंठण रात्री घरात घुसून तोडून नेले तर माजी उप मुख्यमंत्र्याच्या स्वीय सहयाकाच्या घराचे दरवाजे तोडून चोरी झाली.  पोलिसांविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.   

Website Title: Latest News theft in Jain Temple 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here