Home अकोले अकोले तालुक्याच्या विकासासाठी आ. डॉ. किरण लहामटे यांनी बनवली ब्लू प्रिंट

अकोले तालुक्याच्या विकासासाठी आ. डॉ. किरण लहामटे यांनी बनवली ब्लू प्रिंट

अकोले: अकोले तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेसाठी अकोले विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार किरण लहामटे यांनी ब्लू प्रिंट बनवली. आ. किरण लहामटे अकोले तालुक्याच्या विकासासाठी मी स्वतःला वाहून घेतले आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी या अकोले तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले.

आमदार किरण लहामटे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना सातेवाडी गट व राजुर गट या विभागांमध्ये सामान्य नागरिकांच्या प्रश्न व अडी अडचणी सोडविण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा विजय मिळवण्यास शक्य झाले.

आमदार किरण लहामटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,  सर्वात प्रथम रस्ते, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आरोग्य, शिक्षण या कामासाठी प्राधान्य देणार आहे . त्याचबरोबर अकोले तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करणार आहे तसेच भंडारदरा सांदण दरी हरीश्चंद्रगड, तालुक्यामध्ये काजवा महोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. या पर्यटकांन बरोबर महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा मार्गी लावणार आहे.

अकोले तालुका आदिवासी तालुका असल्याकारणाने नऊ टक्के जी ग्रँड आहे,  तिचा पुरेपूर वापर करून सामान्य माणसाचे जनजीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच तालुक्यात कुपोषण आरोग्याची असणारी समस्या तसेच शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे काम अग्रक्रमाने केले जाईल.

अकोले तालुक्यात एमआयडीसी निर्माण करावी अशी तरुण वर्गातून इच्छा व्यक्त होत असताना अकोले तालुक्यांमध्ये लघु एमाडिसी निर्माण करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये अकोले तालुक्यांमध्ये एमआयडीसीचे युवकांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले

आदिवासी भागांमध्ये पारंपरिक उद्योग पापड उद्योग नाचणी उद्योग वनौषधी उद्योग निर्माण करून रोजगाराच्या संधी महिलांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आदिवासी समाजातील महिलावर्ग हा नारायणगाव ओतुर ठाणगाव सिन्नर याठिकाणी मोलमजुरीसाठी जात असतो थांबण्यास मदत होईल.

राजूर या ठिकाणी काही दिवसांमध्येच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी  आपण जनता दरबार चालू करणार असल्याचेही सांगितले. तसेच अकोले येथील  अतिवृष्टीमुळे  संपूर्ण तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाले आहे तरी बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले.  

Website Title: Latest News Akole taluka Blue Print of development

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here