Home महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड

 मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांची निवड आज करण्यात आली. आज झालेल्या राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी हे राष्ट्रवादी पक्षात सर्वात जास्त  मताधिक्याने निवडून आलेले आमदार ठरले आहे.  नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने ५४ जागा मिळविल्या आहेत. कॉंग्रेस पेक्षा अधिक जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार आहे.

आजच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधिमंडळ गटनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अजित पवार यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली.  

Website Title: Latest News Ajit Pawar elected as the legislative leader of NCP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here