Home अकोले ब्राम्हणवाडा येथे मानाच्या काठीला लागली हळद

ब्राम्हणवाडा येथे मानाच्या काठीला लागली हळद

ब्राम्हणवाडा:  लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पिंपळगाव रोठा(ता.पारनेर) येथील यात्रेतील  मानाच्या काठीला ब्राम्हणवाडा ता.अकोले याठिकाणी पारंपारिक पद्धतीने हळद लावण्यात आली.

पौष पोर्णिमेला खंडोबाचे लग्न  ला  खंडोबाचे लग्न म्हाळसा देवी बरोबर झाल्याचा स्कंध पुराणात उल्लेख आढळतो.त्या मुळे या लग्न सोहळ्या निमित्त नवीन वर्षातील पहिली मोठी यात्रा कोरठण ता.पारनेर या ठिकाणी भरते.तीन दिवस हि यात्रा चालते.पारंपारिक पद्धतीने ब्राम्हणवाडा येथील मनाची काठी ने खंडोबा दर्शन केल्यानंतर या यात्रेची सांगता होते. 

 त्या निमित्त ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठीला विधिवत हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला.हळद लावण्या पूर्वी महिलां वाजत गाजत गावातून  काठीचा वाडा या ठिकाणी आल्यावर जात्यावर हळद दळून ती विधीपूर्वक काठीला लावली .या वेळी महिलांनी देवाचा महिमा,ओव्या,गाणी सुमधुर आवाजात म्हणाल्या.व एकमेकींना हळद लाऊन पिवळे केले.पार्वताबाई व खंडू गायकर व दिपाली व संजय गायकर या दाम्पत्याच्या हस्ते आरती करण्यात आली. 

 या वेळी सरपंच सखुबाई फलके,ग्रामपंचायत सदस्या मिना गायकर,उज्वला गायकर यांच्या सह सीमा गायकर,अंजना गायकर,माधुरी गायकर,वैजयंता गायकर,रुख्मिणी गायकर,रोहिणी गायकर,उज्वला गायकर,दिपाली गायकर,यांच्या सह उप सरपंच भारत आरोटे,जय मल्हार मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायकर,सचिव अर्जुन गायकर,सह सचिव संतोष गायकर, खजिनदार पोपट गायकर,पोलीस पाटील शिवाजी हांडेसिताराम गायकर,राजाराम गायकर,यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.प्रारंभी शाहीर मंगेश भोसले,व शाहीर नामदेव शिंदे,यांनी खंडोबाच्या गोंधळ गीतांचे गायन केले.

 गेली शेकडो वर्ष पारंपारिक पद्धतीने कोरठाण खंडोबाच्या काठीचा मान गायकर परिवारा कडे चालत आलेला आहे.दि दहा ते बारा जानेवारी या दरम्यान संपन्न होणाऱ्यायात्रे निमित्त १०५ फुट उंच मनाची काठी बेल भंडारा उधळत वाजत गाजत ब्राम्हणवाडा येथून पिंपळगाव रोठा याठिकाणी जाते .त्या ठिकाणी कोरठण गडाला प्रदक्षिणा झाल्यावर शासकीय महापूजा झाल्यावर हि मनाची काठी खंडोबाला लावण्यात येते व त्या नंतर या यात्रेची सांगता होते. 

 यात्रा काळात सुमारे सात ते आठ लाख भाविक आपल्या कुलदेवतेचे दर्शन करण्यासाठी व तळीभांडार करण्यासाठी या ठिकाणी येत असतात.

Website Title: Latest News Turmeric began to stick

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here