Home संगमनेर संगमनेर: युवकाने गॅलरीतून उडी घेऊन केली आत्महत्या 

संगमनेर: युवकाने गॅलरीतून उडी घेऊन केली आत्महत्या 

संगमनेर: संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये सफाईचे काम करणाऱ्या निलेश चव्हाण या ३२ वर्षाच्या युवकाने क्लबच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. हि घटना बुधवारी घडली.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मालपाणी हेल्थ क्लबच्या शेजारी असणाऱ्या इमारतीवरून या युवकाने सायंकाळी ७ च्या दरम्यान ८० फुट उंचीवरून उडी घेतली. त्याचा डोक्याला जबर मार लागला. त्यास तातडीने मालपाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे शहर पोलिसांना कळविले. निलेशच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. वैयक्तिक कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे समजते. याअगोदरही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एका कर्मचार्याने त्यास तातडीने बाजूला ओढून वाचवले होते. अशी चर्चा आहे.

शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. शहरातील मालदाड रोड परिसरात तो राहत होता. तो एका खासगी कंपनीमार्फत हेल्थ क्लबच्या साफ सफाईचे काम करत होता.

Website Title: Latest News Youth commits suicide by jumping from the gallery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here