Home अकोले अकोलेत शनिवारी आ. रोहित पवार यांचे  जाहीर व्याख्यान 

अकोलेत शनिवारी आ. रोहित पवार यांचे  जाहीर व्याख्यान 

अकोले (प्रतिनिधी)-:अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने  पत्रकार दिना निमित्ताने  बारामती ऍग्रो लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार रोहित पवार यांचे “ग्रामीण महाराष्ट्र:आव्हाने आणि उपाय”या विषयावर जाहीर व्याख्यान’ शनिवार,दिनांक 11 जाने.2020 रोजी सायं.5 वाजता महाराजा लॉन्स  अकोले येथे आयोजित करण्यात आले आहे.
अकोले तालुका पत्रकार संघ दरवर्षी विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवत असतात.पत्रकार दिना निमित्ताने यावर्षी आ रोहित पवार यांचे  जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
 या जाहीर व्याख्यानास उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य, सचिव हेमंत आवारी, उपाध्यक्ष प्रकाश आरोटे, प्रकाश महाले, ज्ञानेश्वर खुळे, मच्छिद्र देशमुख, संपर्क प्रमूख  विद्याचंद्र सातपुते, प्रकल्प प्रमुख भाऊसाहेब चासकर, सहसचिव चंद्रशेखर हासे, खजिनदार अजय जाजू, सहसंपर्क प्रमुख दिनेश जोरवर,कायदे विषयक सल्लागार ऍड. अनिल आरोटे, विश्वस्त विजय पोखरकर, डी के वैद्य, प्रकाश टाकळकर, भाऊसाहेब मंडलिक, मगन येलमामे, श्रीनिवास येलमामे व  सर्व सदस्य यांनी केले आहे.
Website Title: Latest News Akole Rohit Pawar Speech

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here