Home अकोले अकोलेत महावितरणचे ३१ ठिकाणी छापे, चार लाखांचा दंड

अकोलेत महावितरणचे ३१ ठिकाणी छापे, चार लाखांचा दंड

अकोले: महावितरण कंपनीच्या अकोले उप विभागीय कार्यालयाच्या तीन भरारी पथकांनी ठिकठिकाणी ३१ ठिकाणी छापे टाकून सुमारे चार लाख १४ हजारांचा दंड केला आहे.

महावितरण कंपनीच्या अकोले उप विभागीय कार्यालयाच्या अकोले शहराच्या १० व ग्रामीण ६ जणांच्या पथकांनी ही कारवाई केली. त्यांनी एका दिवसात विविध भागात वीज चोरी पकडली. असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता डी.के.बागुल यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, या पथकामध्ये सहा अभियंते व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये २९ घरगुती, एक व्यावसायिक व एक औद्यागिक वीज चोरी पकडण्यात आली आहे. धुमाळवाडीत १०, पिंपळगाव निपाणीत ५, चास १०, गणोरे २, लाहित ३ तर माळीझापमध्ये एक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  

Website Title: Latest News Impressionss of MSEB in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here