Home अकोले पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम यावर्षी पूर्ण होणार: आ. डॉ. किरण लहामटे

पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम यावर्षी पूर्ण होणार: आ. डॉ. किरण लहामटे

अकोले: पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम २०२० मध्ये पूर्ण केले जाईल २०२१ मध्ये हा पूल वापरता येईल अशी ग्वाही संबधित अधिकारी वर्गाने आ. डॉ. किरण लहामटे यांना दिली.

काल राजूर येथे आमदार डॉ. लहामटे यांच्या निवासस्थानी पिंपरकणे उड्डाणपूल, कोतूळ पूल तसेच अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रखडलेल्या कातालापूर, मान्हेरे, चिंचोडी, माळेगाव, केळुंगण, कोहंडी व इतर ठिकाणांच्या उपसासिंचन योजानासंदर्भात अभियंता शासकीय अधिकारी वर्ग यांच्या समवेत डॉ. लहामटे यांची बैठक झाली. तेव्हा अधिकारी वर्गाने आमदार लहामटे यांना शब्द दिला.

या बैठकीमध्ये पिंपरकणे उड्डाणपुलाबाबत आ. डॉ. लहामटे यांनी चर्चा केली असता २०२० मध्ये काम पूर्णत्वास जाणार असून २०२१ मध्ये हा पूल वापरता येईल. असे अधिकार्यांनी सांगितले. लवकरच कोतूळ पुलाचे काम सुरु होईल. तोही लोकांसाठी तातडीने उपलब्ध केला जाईल. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रखडलेल्या कातालापूर, मान्हेरे, चिंचोडी, माळेगाव, केळुंगण, कोहंडी व इतर ठिकाणांच्या उपसासिंचन योजाना पूर्ण होतील. त्यादेखील लवकरच सुरु होईल असे कार्यकारी अभियंता संगीता जगताप यांनी सांगितले.

यावेळी शाखा अभियंता नानासाहेब खर्डे, उपविभागीय अभियंता कासार, सहायक अभियंता संदीप देशमुख, तांबोळी, वाणी उपस्थित होते.

Website Title: Latest News Pimparkane flyover will be completed this year

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here