Home अकोले नेहरु युवा केंद्र अहमदनगर तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदय विजयी

नेहरु युवा केंद्र अहमदनगर तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सर्वोदय विजयी

अकोले :-  नेहरू युवा केंद्र अहमदनगर  आयोजित  तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच अकोले महाविद्यालयात अकोले येथे पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन अकोले तालुका क्रीडा संघटनेचे माजी अध्यक्ष संपतराव नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली व शिवाजी चौधरी, आजी अध्यक्ष सोपान लांडे, प्रा. विनोद तारू, संपादक अजित गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.

या स्पर्धांमध्ये एकूण आठ संघांनी प्रवेश नोंदविला, यामध्ये गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर, राजूर प्रथम क्रमांक, ऍड. एम. एन. देशमुख महाविद्यालयात, राजूर द्वितीय क्रमांक तर अकोले महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी सर्वोदय राजूर संघाची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना  प्रा विनोद तारू यांनी मार्गदर्शन केले

याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव  मिलिंद उमराणी, व्यवस्थापक प्रकाश महाले प्राचार्य एम.डी. लेंडे, उपप्राचार्य एल.पी. पर्बत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. 

Website Title: Latest News neharu youth center sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here