लोकांनी पुन्हा जुनं ते सोनं याउक्ती प्रमाणे सेंद्रिय शेतीकडे वळावे: राहीबाई पोपेरे
अकोले (प्रतिनिधी)– समाजातील लोकांनी पुन्हा जुनं ते सोनं याउक्ती प्रमाणे सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले.माझ्या प्रसिद्धी पेक्षा मी मायेने जतन केलेल्या पारंपारिक बियांना मिळालेली प्रसिद्धी जास्त आनंददायी आहे अशी भावना व्यक्त केली.
अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे ‘मी कशी घडले’या आत्मकथनपर सवांद कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य होते.
यावेळी बायफ चे विभागीय अधिकारी जितीन साठे, उपाध्यक्ष प्रकाश आरोटे,सचिव हेमंत आवारी,विजयराव पोखरकर, अलताफ शेख,शांताराम गजे, विद्याचंद्र सातपुते, संजय शिंदे, राजेंद्र मालुंजकर,अण्णा चाैधरी, सचिन खरात, दिनेश जोरवर, संदीप देशमुख, अमोल आरोटे, बाळासाहेब चौधरी, निलेश चौधरी,सौ.रेखा आवारी,शितल बिबवे-वैद्य ,सौ. लता चौधरी,सौ.वैशाली चौधरी,आदि सह पञकार उपस्थित होते.
यावेळी पञकारांशी ग्रामीण शैलीत दिलखुलास सवांद साधतांना सौ. पोपेरे म्हणाल्या कि -माझे माहेर व सासर दोन्ही कोंभाळणेच. विवाहा पूर्वी व त्यानंतर प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जावे लागले. काैटुबिक परिस्थिती हलाकीची मुळे शिक्षण घेता आले नाही. वडिलांनी मार्गदर्शन केले माञ शिक्षणाची खंत कायम राहीली. लग्णानंतर माझ्या चारही प्रसुती जणावरांच्या गोठ्यात झाल्या. अनके दिवस गोठ्यात राहून कष्टाचे दिवस काढले माञ कायम समाजासाठी चांगले करण्याची मनात इच्छा होती.मला शेती व बियांणाची आवड होती.बियानांचे जतन करत असताना बायफचे अधिकारी जितीन साठे हे भेटले .पहिल्याच दिवशी सुमारे सतरा पिकांचे 48 पारंपरिक वाण माझ्याकडे साठवलेले त्यांनी पाहिले व त्याची फोटोसह नोंद पहील्यांदाच घेतली गेली.हीच संख्या पुढे दिडशे च्या वर गेली.बाएफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी माझे पारंपरिक बियाणे संवर्धनाचे काम जोडले गेले .त्यानंतर बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांचे हस्ते माझ्या राहते घरी छोट्याशा खोलीत देशी बियाणांची पहिली बीज बँक सुरू केली .आता माझ्याकडे मोठी बीज बँक असून राज्याच्या काना कोपऱ्यातून शेतकरी बियाणे नेण्यासाठी येतात . विद्यापीठ , महाविद्यालये ,शाळा यांचे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी दुरून येतात .बियांचा प्रसार , जतन व मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था आम्ही आदिवासी शेतकरी एकत्र येऊन बाईफच्या मार्गदर्शननाने सुरू केली आहे .त्यात परिसरातील सुमारे 30 ते 40 गावांना सहभागी करून घेतले आहे .पारंपरिक वाणांचे जतन होण्यासाठी गावो गावी गावरान बियांच्या बँका तयार व्हाव्यात असे माझे स्वप्न आहे .बायफचे विषय तज्ञ संजय पाटील , योगेश नवले यांचे ही मला अनमोल असे मार्गदर्शन मिळत आहे .व त्याचे मार्गदर्शनाने मला समाजासाठी काही करता आले अशी भावना व्यक्त करुन गावठी बियाणांचे जतन करुन भविष्यातील पिढीलाही ती मिळावी अशी भावना व्यक्त केली.
यावेळी प्राथमिक शिक्षिका सौ.रेखा आवारी यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय सचिव हेमंत आवारी यांनी करून दिला. प्रास्तविक ,स्वागत पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रकाश आरोटे यांनी करून सूत्रसंचालन केले तर आभार अलताफ शेख यांनी मानले.
कोट- 1:
राहीबाई पोपेरे यांनी दिल्लीला राष्ट्रपती भवनातील नारी शक्ती पुरस्कार व चला हवा येऊ द्या , उंच माझा झोका , माझा कट्टा सह विविध राष्ट्रीय टी.व्ही चॅनल वर झालेल्या कार्यक्रमावेळचे अनुभव कथन करुन त्यांनी आज समाजाने विषारी रासायनिक शेती कडून पुन्हा पारंपारिक शेतीकडे वळले पाहिजे. राज्यातल्या व देशातल्या प्रत्येक गावात बियाणांची बॅक निर्माण होऊन प्रत्येक गावात राहीबाई पोपेरे तयार व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोट-2:
पारंपरिक बियाण्याची आदिवासी भागातील क्षेत्रात जाऊन नोंद घेण्याचे काम बाईफच्या माध्यमाने सुरू आहे .स्थानिक बियाणे हे समाज्याची संपत्ती असून त्याचे जतन आणि प्रसार लोक सहभागातून झाला पाहिजे . पारंपरिक ज्ञान आणि बियाणे संवर्धन या कार्याचा प्रसार बायफ मार्फत देश पातळीवर केला जाईल.-.संजय पाटील
चौकट-माझ्या यशात ‘पत्रकारांचा ‘ चा मोठा वाटा- माझ्या यशात अकोले तालुक्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी सांगितले.
जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर
शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: बाळासाहेब माने 9405404536
Website Title: Latest News rahibai Popere