Home अकोले मवेशी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

मवेशी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

अकोले: दोन दिवसांपासुन अतिशय वादात सापडलेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अकोले तालुक्याच्या मवेशी शाखेचे आरोग्य शिबीर नागरिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले. जवळपास 100 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण रुग्णालय,मवेशी व महालॅब  संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे तालुका संघटक योगेश कोंडार यांच्या सौजन्याने हा शिबिर पार पडले. शिबीर पार पाडण्यासाठी सोमनाथ(मोनू) गोडे,प्रवीण कोंडार,वैभव भांगरे,देविदास कोंडार,शंकर भांगरे,उमेश कोंडार,गणेश कोंडार,कुणाल गवारी,किरण कोंडार आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. मनसे तालुका संघटक योगेश कोंडार यांनी मवेशी गावात एक आदर्श निर्माण करून दिला आहे. त्यांचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोले तालुक्याच्या मवेशी शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे बॅनर सलग दोन दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आल्याने, कार्यकत्यांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त करुन या घटनेची निषेध केलाय.

मवेशी गावातील गरजु रूग्णांसाठी 12 डिसेंबर रोजी आरोग्य शिबिराचे मवेशीत आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा सर्व ग्रामस्थांना फायदा घेता यावा तसेच शिबीराची तारीख, वेळ,ठिकाण गावकऱ्यांना समजावी यासाठी हा बॅनर लावण्यात आला होता, मात्र हा बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आल्याने कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Website Title: Latest News MNS camp concluded in a spontaneous

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here