Home अकोले अकोलेत सभापती पदासाठी भाजप सेनेत लढत होणार का

अकोलेत सभापती पदासाठी भाजप सेनेत लढत होणार का

अकोले: अकोले तालुका पंचायत समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि सेनेत लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून उर्मिला राउत, अलका अवसरकर व दत्तात्रय बोऱ्हाडे या तीन जणांपैकी एकाला उमेदवारी मिळेल तर शिवसेनेचे नामदेव आंबरे हे उमेदवार असू शकतील. सभापतीपद ओबीसीसाठी राखीव झाल्याने या पदासाठीचे प्रमुख दावेदार विद्यामान उपसभापती मारुती मेंगाळ व भाजपचे जेष्ठ नेते दत्ता देशमुख सभापतीच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

अकोले पंचायत समितीचे बारा सदस्य आहेत. यात सभापती रंजना मेंगाळ, उप सभापती मारुती मेंगाळ, देवराम सामेरे व नामदेव आंबरे (सर्व शिवसेना), दत्तात्रय बोऱ्हाडे, दत्ता देशमुख, उर्मिला राउत व अलका अवसरकर (सर्व भाजपा), गोरख पथवे, माधवी जगधने, सारिका कडाळे, सीताबाई गोंडके (सर्व राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे. उप सभापतीपदासाठी भाजपकडून राजूर गणाचे पंचायत समिती सदस्य दत्ता देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून मारुती मेंगाळ पुन्हा या पदासाठी मोर्चेबांधणी करून आहेत. भाजपच्या सभापती आणि उपसभापती पदाबाबत माजी मंत्री मधुकरराव पिचड हेच अंतिम निर्णय घेतील. सध्याचे संख्याबळ लक्षात घेता सभापतीपदी भाजपची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

Website Title: Latest News BJP contest in Akole for the post of chairman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here