Home महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन अर्ज मागे तर १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन अर्ज मागे तर १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात

Legislative Council elections, 11 candidates are in the fray for 10 seats

मुंबई | Legislative Council Elections: राज्यसभेनंतर विधानपरिषदेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप समर्थक सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहेत तर राष्ट्रवादी काँग्रसेचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. २० जुन रोजी विधानपरिषद निवडणुका पार पडत आहे. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत.

आता भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे ५ उमेदवार विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकात हंडोरे तर शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर हे विधानपरिषद निवडणुकीचे उमेदवार आहेत. संख्याबळानुसार, भाजपचे ४, राष्ट्रवादीचे २, शिवसेनेचे २ आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा दुसरा उमेदवार आणि भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांच्यात लढत होईल. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत.

विधानसभेत भाजपचे १०६ संख्याबळ आहे. तर काही अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत आहेत. त्यानुसार भाजपचे ४ उमेदवार सहज निवडून येतील. मात्र, पाचव्या जागेवर प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची व्यवस्था भाजपला करावी लागणार आहे. ही जागा जिंकण्यासाठी भाजपला १३० पेक्षा अधिक मतांची गरज आहे. यामध्ये एवढ्या मतांची जुळवाजुळव करणे हे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे भाजप काय खेळी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ४४ आहे. त्यानुसार २७ मते मिळवून काँग्रेसचा १ उमेदवार सहज निवडून येईल. त्यानंतर काँग्रेसकडे १७ मते अतिरिक्त आहेत. काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी काँग्रेसला आणखी १० मतांची गरज असेल.

Web Title: Legislative Council elections, 11 candidates are in the fray for 10 seats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here