Home गडचिरोली जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे रुग्णालयात दाखल

Senior social worker Prakash Amte admitted to hospital

गडचिरोली: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे (Prakash Amte) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप व खोकला यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे येथे विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश आमटे आले होते. या दरम्यान त्यांना तीव्र ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या विविध चाचण्या सुरु असून पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्‍या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉ. प्रकाश आणि आमटे कुटुंबियांशी सध्या संपर्क साधू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Web Title: Senior social worker Prakash Amte admitted to hospital

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here