Home महाराष्ट्र Corona Vaccine: राज्यात १८ वर्षावरील वयोगटातील मोफत लसीकरण, पण ज्यांना शक्य त्यांनी...

Corona Vaccine: राज्यात १८ वर्षावरील वयोगटातील मोफत लसीकरण, पण ज्यांना शक्य त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे दान करा

Maharashtra Free Corona Vaccine 

Corona Vaccine: राज्यात १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होणार असून १८ वर्षावरील वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याबाबत आज बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.

महाविकास आघाडीने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभारी आहोत. पण त्याच सोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी मुख्यमंत्री निधीत लसीकरणाची रक्कम दान करा असे आवाहन महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवकांना केले आहे. ही रक्कम कोविड १९ कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे, ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी मार्गी लागेल. जे पैसे देण्यास सक्षम आहेत त्यांनी जरूर दान करावे असे त्यांनी आवाहन केले आहे.  

Web Title: Maharashtra Free Corona Vaccine 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here