Home महाराष्ट्र लॉकडाऊन वाढविण्यावर कॅबिनेटचे एकमत १५ मे पर्यत कडक निर्बंध आरोग्यमंत्र्यांचे संकेत

लॉकडाऊन वाढविण्यावर कॅबिनेटचे एकमत १५ मे पर्यत कडक निर्बंध आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Maharashtra Lockdown Health Minister Rajesh Tope Hint

मुंबई | Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत असल्याने राज्यसरकारने कडक निर्बंध म्हणत एकप्रकारे लॉकडाऊन लावला आहे. १ मे पर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे मात्र हा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे समजते, मंत्रोमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्यातील करोनाची स्थिती गंभीर असून ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भार पडत असून कोविड सेंटर उभारण्यासाठी नर्सिंग स्टाफ मिळत नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत आणखी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र हा लॉकडाऊन किती दिवसांसाठी असेल याची माहिती लवकरच जाहीर होईल. पण तो १५ दिवसांसाठी असेल असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध असतील असेच दिसून येत आहे.  

Web Title: Maharashtra Lockdown Health Minister Rajesh Tope Hint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here