Home अहमदनगर नगर शहरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने सात बाधिताचा मृत्यू

नगर शहरात एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने सात बाधिताचा मृत्यू

Nagar Seven victims die due to lack of oxygen 

अहमदनगर | Nagar: अहमदनगर जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन नाही. दररोज जिल्ह्यासाठी ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजन अभावी नगर येथील खासगी रुग्णालयातील रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. नगर येथील एका खासगी रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी २० तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला मात्र त्याचबरोबर रुग्णांची वाढ झपाट्याने होत असल्याने ऑक्सिजन अपुरा पडत आहे. उपलब्ध ५० टन ऑक्सिजन हा जिल्हा रुग्णालय व मोठ्या रुग्णालयांना पाठविला जातो. समप्रमाणात न्यायपद्धतीने ऑक्सिजनचे वाटप होत नसल्याने तेथील काही खासगी रुग्णालयातील रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. या सर्व बाबींकडे प्रशासनाकडे वेळ नसल्याने जिल्हाधिकारी स्तरावर कोणतेही नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णांच्या नातेवाईक यांना ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र प्लांटवर मोठ्या प्रमाणात रांगा असल्याने दहा बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. अशीच परिस्थिती एका खासगी रुग्नालायावर येऊन त्यातच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आतातरी उपलब्ध झालेला ऑक्सिजन सर्व हॉस्पिटलला मिळणार का त्याचे नियोजन योग्य पद्धतीने होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Nagar Seven victims die due to lack of oxygen 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here