Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या वाढली  

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या वाढली  

Ahmednagar Corona Death Ration Increased

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७० जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनने केली आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसते. सावेडीत अंत्यसंस्कार सुरु केल्याने अमरधामवरील ताण काहीसा कमी झाला आहे.

तर कोरोनावर मात केलेल्या २७२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता एकूण बरे झालेल्या रुग्णांची सांख्य १ लाख ४० हजार ४११ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.०८ टक्के झाले आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २६५५ रुग्ण वाढले आहे. त्यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २२ हजार ७०० झाली आहे.

दरम्यान डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ६२२, अकोले ९०, जामखेड २७, कर्जत १५८, कोपरगाव ११२, नगर ग्रामीण २७२, नेवासे १८२, पारनेर १४५, पाथर्डी ९१, राहता २०९, राहुरी १५०, संगमनेर १३९, शेवगाव १०८, श्रीगोंदे १०४, श्रीरामपूर २२५  भिंगार २० या रुग्णांचा समावेश आहे.

एकूण रुग्णसंख्या: १,६५,०३०

एकूण मृत्यू: १९१९

उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या: २२७००

Web Title: Ahmednagar Corona Death Ration Increased

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here