Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

संगमनेर तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीला ठोकले टाळे

Sangamner News:  सरपंच यांच्याकडून बेकायदेशीर आणि अडवणुकीचे काम होत असून त्यांच्यावर कारवाई करावी. सरपंच यांच्याकडून अडवणूक: गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन. (Maldad gram panchayat in Sangamner).

Maldad gram panchayat in Sangamner taluka was knocked down

संगमनेर: सरपंच यांच्याकडून बेकायदेशीर आणि अडवणुकीचे काम होत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी. यासाठी तालुक्यातील मालदाड ग्रामपंचायतीला गुरुवारी (दि.१२) ग्रामस्थांनी टाळे ठोकले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना शुक्रवारी (दि.०६) निवेदन दिले होते. त्यावर ग्रामपंचायत सदस्यांसह ४५७ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

मालदाड ग्रामपंचायतीचे सरपंच गैरकारभार करतात. भ्रष्टाचार, सभेचे इतिवृत्त बदलणे, ग्रामसभेचे ठरावानुसार कामकाज न करणे, वित्त आयोगातील निधी परस्पर मनमानी पद्धतीने खर्च करणे, ग्रामस्थांना करमागणी पत्र न देताच त्यांच्यावर वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करणे, खोटे पंचनामे करणे, स्ट्रीटलाईट, स्वच्छता आरोग्य आदी कामांकडे दुर्लक्ष करतात. तसेच शिवार रस्ते डांबरीकरण करणे यासारख्या अनेक कामांसाठी आलेला शासकीय निधी खर्च न करता कामे प्रलंबित ठेवणे, शासनाच्या मुरूमीकरणासाठी आलेल्या निधीतून शिवार रस्त्यांवर मुरूम न टाकताच काही सदस्यांच्या मदतीने परस्पर पेमेंट काढून अपहार करणे, यांसारख्या प्रश्नांवर ग्रामस्थांनी ऑगस्ट २०२२ मध्ये गटविकास अधिकारी नागणे यांच्याकडे अर्ज दिला होता. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सरपंच यांचा मनमानी गैरकारभार पूर्ववत सुरू आहे. असेही निवेदनात म्हटले आहे. त्यावर ग्रामपंचायत सदस्य परशराम गोफणे, सुनीता नवले, अश्विनी नवले, अमित नवले, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास नवले, सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब नवले, उपाध्यक्ष प्रशांत नवले आदींची नावे आणि सह्या आहेत.

Web Title: Maldad gram panchayat in Sangamner taluka was knocked down

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here