Home अहमदनगर मुळा नदीपात्रात पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

मुळा नदीपात्रात पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

Ahmednagar Nevasa News: पाचेगाव येथील एका युवकाचा मुळा नदीपात्रातील पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची घटना.

Youth drowned in Mula riverbed

नेवासा: तालुक्यातील  पाचेगाव येथील एका युवकाचा मुळा नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास निंभारी शिवारात उघडकीस आली.

संदीप कल्याण नामेकर (वय २०, रा. पाचेगाव, ता. नेवासा) असे या बुइन मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक सोमवारी (दि.९) दुपारी तीन वाजता घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेला होता. गेल्या तीन दिवसांपासून कुटुंब त्याचा परिसरात शोध घेत होते. मुलगा गायब झाल्याची तशी तक्रारही युवकाचे वडील कल्याण नामेकर यांनी नेवासा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.

गुरुवारी सकाळी दहा वाजता निंभारी शिवारातील मुळा नदीपात्रात पाण्यावर एक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे पाचेगावचे उपसरपंच श्रीकांत पवार यांनी कुटुंबाला कळविले. गायब युवकाचा चुलतभाऊ नवनाथ नामेकर याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पाण्यावर तरंगणारा मृतदेह गायब असलेल्या युवकाचाच असल्याचे निष्पन्न झाले. तेथील नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी मयत युवकाचा चुलतभाऊ नवनाथ प्रल्हाद नामेकर यांनी नेवासा पोलिस ठाण्यामध्ये खबर – दिली. उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title: Youth drowned in Mula riverbed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here