Home अहमदनगर अहमदनगर: गादी कारखान्याला भीषण आग, कारखाना भस्मसात

अहमदनगर: गादी कारखान्याला भीषण आग, कारखाना भस्मसात

Ahmednagar News:  नगर-औरंगाबाद महामार्गावरील नासीर खान यांच्या गादी कारखान्याला भीषण आग (Fire) लागल्याची घटना.

Huge fire at Gadi factory, factory burnt down

अहमदनगर: नगर-औरंगाबाद महामार्गावरील नासीर खान यांच्या गादी कारखान्याला भीषण आग लागली. सुमारे तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, इतर दुकानांनाही त्याची झळ पोचली.

गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती महापालिकेच्या अग्नीशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापूस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग विझविण्यासाठी महापालिका अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांच्या सात फेर्‍या झाल्या. दुपारपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक बाळासाहेब घोरपडे, चिंधू भांगरे, भरत पडगे, बाबासाहेब कदम, मच्छिंद्र धोत्रे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Huge fire at Gadi factory, factory burnt down

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here