Home अकोले भंडारदरा परिसरात मान्सूनचे दमदार आगमन

भंडारदरा परिसरात मान्सूनचे दमदार आगमन

भंडारदरा : अहमदनगर जिल्हयाची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात गुरूवारी रात्री ९ वाजता मान्सूनचे जोरदार आगमन झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाच्या गावातच उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने भंडारदरा परिसरातील बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
अकोले तालुक्यातील पावसाचे माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या भंडारदरा धरण परिसराला गेल्या अनेक दिवसांपासून वरुणराजाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे आदिवासी बांधवांनी केलेली भाताची पेरणी वाया जाते की काय? अशी शंका आदिवासींच्या मनात होती. बऱ्याच ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरलेले भाताचे बी रोपामध्ये तयार झाल्याने ती रोपेही पाऊस नसल्याने करपू लागली होती. गुरूवारी संध्याकाळी पाच वाजेनंतर अचानक भंडारदऱ्याच्या हवामानात बदल होऊन दाट धुक्यांनी भंडारदा व्यापभंडारदरा परिसरात मान्सूनचे दमदार आगमन
भंडारदरा : अहमदनगर जिल्हयाची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा परिसरात गुरूवारी रात्री ९ वाजता मान्सूनचे जोरदार आगमन झाले. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाच्या गावातच उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने भंडारदरा परिसरातील बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
अकोले तालुक्यातील पावसाचे माहेरघर म्हणून ख्याती असलेल्या भंडारदरा धरण परिसराला गेल्या अनेक दिवसांपासून वरुणराजाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे आदिवासी बांधवांनी केलेली भाताची पेरणी वाया जाते की काय? अशी शंका आदिवासींच्या मनात होती. बऱ्याच ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरलेले भाताचे बी रोपामध्ये तयार झाल्याने ती रोपेही पाऊस नसल्याने करपू लागली होती. गुरूवारी संध्याकाळी पाच वाजेनंतर अचानक भंडारदऱ्याच्या हवामानात बदल होऊन दाट धुक्यांनी भंडारदा व्यापला गेला. रात्री ९ नंतर पावसाने जोर धरला. ती शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर मात्र पाऊसाचा जोर मंदावला . धरणाच्या पाणलोटातील पांजरे गावात १९ मिमी तर रतनवाडीत ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी तलावावर १८ मिमी पाऊस पडला असून, या पावसाच्या आकडेवारीवर भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या अधिपत्याखाली बिनतारी यंत्रचालक प्रकाश चव्हाण व बाळू लोहेगावकर हे लक्ष ठेऊन आहेत.
ला गेला. रात्री ९ नंतर पावसाने जोर धरला. ती शुक्रवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर मात्र पाऊसाचा जोर मंदावला . धरणाच्या पाणलोटातील पांजरे गावात १९ मिमी तर रतनवाडीत ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी तलावावर १८ मिमी पाऊस पडला असून, या पावसाच्या आकडेवारीवर भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या अधिपत्याखाली बिनतारी यंत्रचालक प्रकाश चव्हाण व बाळू लोहेगावकर हे लक्ष ठेऊन आहेत.

Website Title :Manasun’s Strong Arrival In Bhandara Area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here