Home अकोले मुळा पाणलोट क्षेत्रातील अं‍बित धरण ओव्हर फ्लो!

मुळा पाणलोट क्षेत्रातील अं‍बित धरण ओव्हर फ्लो!

अकोले : मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुळा नदीवरील पहिला अंबित लघुपाटबंधारे तलाव हा २८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला असल्याची माहिती जलसंपदाचे सहाय्यक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली. मुळा नदीच्या उगमस्थानापासून पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाला.

१९३ घनफूट क्षमतेचा अंबित लघूप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सद्यस्थितीत अंबित लघूप्रकल्पातून मुळा नदीत ५०० क्युसेक विसर्ग पाणी झेपावत आहे. या अंबित धरणाच्या लाभक्षेत्रातील अंबित, शिसवद, खडकी, पैठण, पाडाळणे, धामनगावपाटपर्यंतचा परिसर येत असल्याने सिंचनासाठी अंबित लघु प्रकल्प महत्वपूर्ण ठरला आहे. अंबित भरून वाहू लागल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Website Title : Ambit Dam Overflow In Radha Catchment Area!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here