Home अकोले अकोल्यात एमआयडीसी स्थापन करा; उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे मागणी

अकोल्यात एमआयडीसी स्थापन करा; उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे मागणी

अकोले: अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) ची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे, डॉ. किरण लहामटे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

अकोले तालुक्यातील जनतेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका आहे. तालुक्याची लोकसंख्या सात लाखांच्या पुढे आहे. तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची गरज आहे. अकोले तालुक्यांमध्ये मुबलक जमीन व पाणी आहे. या ठिकाणी एमआयडीसी उभी राहिल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल तसेच आदिवासी, गोरगरीब दलित युवकांना उन्नती होईल आणि अकोले तालुक्याच्या विकासाला हातभार लागेल.  विठे जवळची जागा एमअयडीसीसाठी आरक्षित केली आहे. त्यामुळे येथे औद्योगिक वसाहत उभे राहू शकते. तालुक्यातील युवक जे पुण्या मुंबईला कामाला जातात. त्यांना तालुक्यात रोजगार उपलब्ध होईल. अकोले हा तालुका मुंबई- पुणे- नाशिक या विकसित जिल्ह्यांच्या सरहद्दीवर वसलेला आहे. मुंबई – आग्रा हा महामार्ग या तालुक्याच्या कडेने जातो. त्यामुळे या तालुकयाचा विकास होण्याची गरज आहे. ना. सुभाष देसाई यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले आहे.

Website Title: Establish MIDC in Akola; Desire to Industries Minister Desai

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here