Home अकोले अकोले: महिला व ग्रामस्थांनी गावकिच्या विहिरीतुन गाळ उपसा केला.

अकोले: महिला व ग्रामस्थांनी गावकिच्या विहिरीतुन गाळ उपसा केला.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी जहागिरदारवाडी ( ता. अकोले ) येथील महिला ग्रामस्थांनी गावकीची विहीर कोणत्याही सरकारी मदतीशिवाय गाळ उपसा केली.

या गावाला कळसूबाई सारखे उंच शिखर लाभले आहे तरी या गावाला अजून कोणतीही मोठी सरकारी मदत मिळाली नाही

शेवटी सरकारी मदतीची वाट न बघता स्वतः महिलांनी विहिरीतील गाळ उपसा करायला सुरुवात केली मोजक्या पुरुष मंडळींनी साथ दिली.

ग्रामपंचयातीकडून गाळ काढण्यासाठी निधी असतो पण या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक गेले 7-8 महिने झाले फरार आहेत. सोबत ग्रामपंचायतीचे दप्तर अजून त्यांनी जमा केले नाही. तसेच नवीन ग्रामसेवक 2- 3 महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपावर नेमलेले आहेत पण त्यांना अजून दप्तर मिळालेले नाही. यावर अकोले पंचायत समिती येथील अधिकारी वर्गाला विचारणा केली असता उडवा उडावीची उत्तरे दिली जातात.

यावर ठोस असा निर्णय घ्यावा अशी मागणी गावकरी मंडळींनी केली आहे.

विहिरीतील गाळ काढतांना जर कोणतीही हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असेल.कारणं चार वर्षांपूर्वी गाळ उपसायला गेलेल्या गावातील एका मजुराचा पाय सटकून मार लागला होता.

गेला महिना झाला या गावात पाणी सोडण्यात आले नाही गावातील माणसे वणवण पाण्यासाठी भटकत आहेत. भंडारदरा धरणांमधून पाणी आणलेले आहे पण त्या पाण्याचा जहागिरदारवाडी ग्रामस्थांना काही उपयोग होताना दिसत नाही. पाण्यावर काही लोकांचे राजकारण चालू आहे.

मुळात भंडारदरा धरणात जे तीन गावांसाठी  मोटार बसविण्यासाठी जो ब्रिज बांधला आहे त्याचा पैसा फुकट त्या ठिकाणी घालवलेला आहे कारण तो पैसा जर भंडारदरा धरणाच्या खालच्या बाजूला पाईप पसरवण्यासाठी घातला असता तर सतत जी मोटार धरणांमधील पाणी खाली गेल्यावर  ढकलावी लागते तो ताण तीन ग्रामपंचायतीचा वाचला असता.

आणि मोटार जळण्याचे प्रमाण कमी झाले असते. यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे ग्रामस्थांनी मागणी केली आहे. या सामाजीक कामात संतोष खाडे, अंकुश करटुले,मच्छिंद्र खाडे, सुरेश घारे, एकनाथ रोंगटे आदी तरुण तसेच मंदाबाई खाडे, यमुना दराने, अंबाबाई खाडे, द्रौपदा खाडे, आशा खाडे, सुशिला भांगरे, जिजाबाई भांगरे, फसाबाई दराने, संगिता भागडे, जयश्री खाडे,मिना खाडे, गंगुबाई खाडे,झुंबरबाई खाडे, मिराबाई करुटुले, जनाबाई खाडे, सुनंदा करुटुले, कमल दराने, गिरीजाबाई खाडे, मिरा खाडे, अनिता खाडे, सुरेखा दराने आदी ग्रामस्थ तसेच महिलांसह बहुतेक ग्रामस्थ तरुणांनी श्रमदान करून विहीरीतील गाळ उपसा केला. या सामाजीक कार्याची तालुक्यात जोरदार चर्चा होत असुन सर्वत्र कौतुक होत आहे.      

Website Title: Akole women and the villagers raised the sludge from the well 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here