Home अकोले बेकायदेशीर दारू विरोधात लिंगदेव ग्रामस्थ आक्रमक

बेकायदेशीर दारू विरोधात लिंगदेव ग्रामस्थ आक्रमक

अकाेले : तालुक्यातील लिंगदेव येथे कायमस्वरूपी दारूबंदी होण्यासाठी व अवैध पध्दतीने दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, त्यासाठी लिंगदेव येथील ग्रामरक्षक दलाचे सर्व सदस्‌य आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या सर्वांनी १ जुलैपासून उपोषणाला बसणार असल्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे. तसे निवेदन ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले.

लिंगदेव येथे अधिकृत दारुबंदीचा ठराव झाला आहे. मात्र तरीही हा प्रकार सुरू असल्याने ग्रामस्थांनी आजपर्यंत अनेकदा  ही अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून ग्रामसभेचे ठराव केले आहेत. पण पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री सुरूच आहे.

दरम्यान, संबधित विक्रेत्यांवर आणि संबंधित बिटच्या पोलिसांवर कारवाई न झाल्यास दि. १ जुलैपासून उपोषणास बसण्याचे ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.

यावेळी ग्रामसुरक्षा दलाचे अध्यक्ष बाळासहेब कानवडे, उपाध्यक्ष शांताबाई फापाळे, ग्रा. पं. सदस्य अमित घोलम उपस्थित होते.

Website Title : Lingdev Villager Aggressive Against Illegal Liquor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here