Home संगमनेर Sangamner: संगमनेरात मांजा जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Sangamner: संगमनेरात मांजा जप्त, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Manja confiscated at Sangamner 

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातून कुंभार गल्ली व मालदाड रोड येथील मांजा विक्रेता वर कारवाई करत २६ हजाराचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविले जातात. नायलॉन मांजाने आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. हा मांजा अतिशय घातक असल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मांजावर बंदी असतानादेखील अनेक विक्रेते मांजा विकताना दिसून येत आहे.अशा मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले होते.

 संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या पथकाने काल शहरातील मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.

यामध्ये कुंभार गल्ली येथील तांबोळी यांच्या दुकानातून २० हजार ४०० रुपयांचा तर मालदाड रोड येथील अमोल म्हस्के यांच्या दुकानातून ५ हजार ३०० रुपयांचा मांजा पोलीसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दुकान मालक रुकेय्या समशोद्धीन तांबोळी रा. कुंभार गल्ली आणि अमोल सुभाष म्हस्के रा. मालदाड रोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Manja confiscated at Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here