Home अहमदनगर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा संदर्भात हालचाली  

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा संदर्भात हालचाली  

Movements regarding the resignation of Balasaheb Thorat 

अहमदनगर | Balasaheb Thorat  News: मुंबई कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष बदली करण्यात आल्या असून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचालीना वेग आलेला दिसून येत आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाळसाहेब थोरात हे आज दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेणार असल्याचे समजते. मंत्रिपद आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी एका व्यक्तीकडे नको अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. दोन तीन दिवसांत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात यांनी जून २०१९ मध्ये प्रदेशाध्यक्ष पदभार स्वीकारला होता.

पक्षामधील इतर जबाबदारी व मंत्रीपदाची जबाबदारी असल्याने नवीन चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोडण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षात पहिल्यांदा दोन पदांची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे.

आता नवीन कोण प्रदेशाध्यक्ष असणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कॉंग्रेस नेत्यांमध्ये राजीव सातव यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. तसेच अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना पटोले यांची नावे चर्चेत आहेत.

Web Title: Movements regarding the resignation of Balasaheb Thorat 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here