Home संगमनेर महिलांनी संकटांशी खचून न जाता जिद्दीने उभे राहून प्रगती करावी: स्मिता गुणे

महिलांनी संकटांशी खचून न जाता जिद्दीने उभे राहून प्रगती करावी: स्मिता गुणे

Sangamner Women should stand firm Smita Gune

संगमनेर | Sangamner: सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाचा आरंभ करताना खूप अडचणींना सामोरे जावे लागले.  शाळेत जाताना एक साडी अतिरिक्त बरोबर घेऊन जात असत.अंगावर शेण मातीचे गोळे झेलत शाळेत पोहचल्यावर त्या साडी बदलत असत, मुलींसमोर शिकवायला जात असत. सावित्रीबाईंच्या चरित्रातून महिलांना संकटाशी कसे लढावे याची शिकवण मिळते.  महिलांनी संकटाशी खचून न जाता जिद्दीने , धीराने उभे राहून आपली प्रगती करावी . त्याकाळी स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर होत होता. चूल आणि मुल यापलीकडे स्त्रीयांचे विश्व नव्हते. स्त्रीयाना देखील शिकावेसे वाटत होते परंतु शिक्षणाच्या द्वारे त्यांच्यासाठी दारं बंद होते. ती खुली करण्याचे महान कार्य सावित्रीबाईंनी केले असे उदगार प्रसिद्ध लेखिका, सूत्रसंचालिका स्मिता गुणे यांनी काढले .

संगमेनर साहित्य परिषद आयोजित ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ” निमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याता म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महिला अधिकारी सुप्रिया गवांदे म्हणाल्या, चूल आणि मुल या संकल्पनेच्या पुढे जाऊन स्त्रीचे जग आहे हे जगापुढे सांगणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व ही संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या सर्व स्त्री वर्गाला नमन करते , गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल या चित्रपटातील भारतीय वायुसेनेत कर्तव्य बजावणारी पहिली वैमानिक म्हणून तिने सन्मानजनक कामगिरी बजावली. चित्रपट पाहताना सावित्रीबाईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही .  सध्याचं बदलते युग महिलांना प्रोत्साहीत करत आहे त्यामुळे महिला बऱ्याच क्षेत्रातआघाडीवर आहेत. मलाही घडविण्यात माझे आई – वडिल , सर्व गुरुजन , माझे पती व माझे दुसरे माहेरघर म्हणजे माझे सासर कडवंगे सर्व मंडळी यांचा मोलाचा वाटा आहे . प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री  असते परंतु प्रत्येक कर्तबगार स्त्रीच्या मागे तिचे पूर्ण कुटुंब असते .

मंगला पाराशर म्हणाल्या .”मला माझे सासरे यांनी प्रचंड साथ दिली, मदत केली ज्यामुळे मी खूप शिकले आणि प्रगती केली.”

दिलीप उदमले म्हणाले , ” १८९६ ते १९९० या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी खऱ्या अर्थाने समाज सेवा काय असते याचा वस्तुपाठ दिला.  २० पैकी एकजण मृत्यमुखी पडत होता. असा तो काळ होता. स्वतः पुढे होऊन हडपसरच्या माळरानावर झोपडीवजा दवाखाने सुरु केले. दीन दलित, गोर-गरीब यांची सेवा केली आणि अशातच त्यांना प्लेगची लागण झाली, यातच  या महान मातेचे देहावसन झाले.

ज्ञानेश्वर राक्षे यांचे संकल्पनेतून संगमनेर साहित्य परिषदेने सुरभी सुपर मार्केट येथील महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

यावेळी ज्ञानेश्वर राक्षे, लक्ष्मण ढोले, शेख इद्रिस, असिफ अली सय्यद अली, बाळकृष्ण महाजन, अनिल सोमणी , दिलीप उदमले, विकास खेडकर, सुरेश परदेशी, अमोल गवांदे, सविता गवांदे, उषा कपिले, रामचंद्र कपिले, डॉ.सुधाकर पेटकर आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Sangamner Women should stand firm Smita Gune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here