Home अहमदनगर इमारतीवरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

इमारतीवरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

Shirdi Death of a construction worker

शिर्डी | Shirdi: शिर्डी शहरातील पोलीस कार्यालय व निवासस्थान बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून पडून एका तरूण मजुराची मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिर्डी शहरात महाराष्ट्र शासनाच्या पोलीस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून कार्यालय व निवास्थान अशा सात मजली इमारतीचे काम सुरु आहे. हे काम नाशिक येथील ठेकेदाराच्या मार्गदर्शनाखाली अंतिम टप्प्यात आहे. शामलाल धरमलाल विजेवार वय ४२ रा.जामेशी ता. किरणपूर मध्यप्रदेश याचा २६ डिसेंबर रोजी साडे वाजेच्या सुमारास काम करीत असताना पडून मृत्यू झाला. या इमारतीच्या कामाकरिता परराज्यातील गरीब मजूर आणण्यात आले आहे. विजेवार हा मित्रांसह कामावर आला होता. यावेळी ही घटना घडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालयाने दिलेल्या माहितीवरून शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या मृत्यूस जबाबदार कोण? ठेकेदाराकडून दुर्लक्ष झाले आहे का? याची चौकशी करण्याची गरज आहे. ठेकेदाराने मात्र मला काही माहित नाही असे सांगत मौन बाळगले आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.  

Web Title: Shirdi Death of a construction worker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here