Home अहमदनगर लग्नसमारंभात रबडी खाल्याने ३५ जणांना विषबाधा

लग्नसमारंभात रबडी खाल्याने ३५ जणांना विषबाधा

Rahuri people poisoned by eating at a wedding

राहुरी: राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील लग्न  सोहळ्यात  दुधाची रबडी खाल्ल्याने ३५ जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.
या विषबाधा झालेल्या व्यक्तींना विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २५ रुग्ण हे राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल आहेत तर काहींवर देवळाली प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रविवारी टाकळीमिया येथे लग्न समारंभ पार पडला. दुपारी जेवण झाल्यानंतर काही वेळाने काहीना पोट दुखणे, उलट्या, जुलाब, पोटात गडबड, चक्कर येणे असा प्रकार होऊ लागल्याने ही विषबाधा असल्याचा शंका व्यक्त करण्यात आली.

रुग्णांना तातडीने विवेकानंद नर्सिंग होम मध्ये नेण्यात आले त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी अन्नातून विषबाधा झाली असल्याचे सांगितले. या विषबाधेत काही मुलांचाही समावेश आहे.

Web Title: Rahuri people poisoned by eating at a wedding

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here