Home अहमदनगर शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, अश्लील व्हिडियो बनवून……

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, अश्लील व्हिडियो बनवून……

Ahmednagar News: एका ४० वर्षीय विवाहित महिलेला बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. ते संबंध करताना त्याचा अश्लील व्हिडिओ बनविला तसेच धमकी देत अत्याचार (Rape) केल्याचे समोर.

Married woman assaulted in Shirdi by making obscene video rape

शिर्डी | Shirdi News:  शिर्डीत महिलेवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ४० वर्षीय विवाहित महिलेला बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. ते संबंध करताना त्याचा अश्लील व्हिडिओ बनविला तसेच धमकी देत अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडित महिलेला दिली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी निवृत्ती गोपीनाथ गोंदकर याच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी निवृत्ती गोपीनाथ गोंदकर (वय-50, राहणार- बिरोबा रोड, नवीन बाजार तळ, शिर्डी) याने एका ४०  वर्षे वयाच्या विवाहित महिलेला बळजबरीने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करून शरीर संबंध केले. यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने पीडित महिलेबरोबर अत्याचार करण्याचे मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले, धमकी देऊन शिवीगाळ, मारहाण केली व वेळोवेळी बलात्कार केला.

पिडीत महिलेने शिर्डी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपी निवृत्ती गोंदकर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सपोनी.दाभाडे हे करीत आहे.

Web Title: Married woman assaulted in Shirdi by making obscene video rape

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here