Home क्राईम संगमनेर: ग्रामविकास अधिकार्‍याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल

संगमनेर: ग्रामविकास अधिकार्‍याला धक्काबुक्की, गुन्हा दाखल

Sangamner Crime:  मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात येवून ग्रामविकास अधिकार्‍याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना.

Crime has been registered against the village development officer

संगमनेर:  मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात येवून ग्रामविकास अधिकार्‍याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणार्‍याविद्ध तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंभोरे गावात ही घटना घडली.

विशाल संजय गायकवाड (रा. अंभोरे, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. विशाल गायकवाड हा शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत अंभोरे ग्रामपंचायतीमध्ये गेला. तेथे त्याने गाय गोठा यादी दाखविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांच्याकडे केली. जेजूरकर यांनी त्याला ‘तू आता दारुच्या नशेत आहेस, उद्या सकाळी ये’ असे म्हटले. याचाच राग येवून विशाल गायकवाड याने जेजूरकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

तू शिवीगाळ करु नकोस असे समाजावून सांगत असतांना गायकवाड याने जेजूरकर यांची शर्टची गचांडी पकडून धक्काबुक्की केली. त्यावेळी रामनाथ दशरथ बर्डे, गणेश भिमराज साळवे यांनी विशाल गायकवाड यास बाहेर काढले. त्यावर गायकवाड याने ग्रामपंचायतीला कार्यालयाला बाहेरुन कडी लावून घेतली. त्यामुळे ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण करीत सरकारी कामात अडथळा आणला. त्यामुळे अरुण जेजूरकर यांनी विशाल गायकवाड याच्या चुलत्याला बोलावून घेतले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची कडी उघडून विशाल याला तेथून घेवून गेले.

दरम्यान काही कालावधीनंतर पुन्हा विशाल गायकवाड हा हातात लोखंडी रॉड घेवून ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्याने हातातील रॉडने ग्रामविकास अधिकार्‍यांच्या केबिनचा दरवाजा तोडत नुकसान केले. व जेजूरकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांनी संगमनेर तालुका पोलीस फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विशाल गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 164/2023 भारतीय दंड संहिता 353, 342, 323, 504, 506, 427 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहे.

Web Title: Crime has been registered against the village development officer

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here