Home अकोले अकोलेः विवाहिता दोन चिमुकल्यांसह झाली बेपत्ता

अकोलेः विवाहिता दोन चिमुकल्यांसह झाली बेपत्ता

Breaking News | Akole: मावशीच्या घरातून एक 25 वर्षीय महिला व तिची दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर.

married woman went missing with two small children

अकोलेः तालुक्यातील देवठाण येथून आपल्या मावशीच्या घरातून एक 25 वर्षीय महिला व तिची दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
नैना शांताराम येलमामे (वय २५, हल्ली रा. चाकण, जि. पुणे) ही व तिचे दोन मुले हे देवठाण (ता. अकोले) येथे तिची मावशी मीना उत्तम येलमामे यांच्या घरातून काही एक न सांगता निघून गेले आहेत. सदर बेपत्ता महिला रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ५ फूट ५ इंच, केस लांब व काळे, अंगात लाल रंगाची साडी ब्लाउज, पायात चप्पल उजव्या हाताच्या कांबीवर गोंदलेले आहे. तर मुलगा निखिल शांताराम येलमामे (वय ५) अंगात लाल रंगाचा सदरा व निळ्या रंगाची जिन्स, विजार, पायात निळ्या रंगाचे शूज व मुलगी दुर्वा शांताराम येलमामे (वय ७) अंगात आकाशी रंगाची फ्रॉक, निळ्या रंगाचे जॅकेट, पायात तपकिरी रंगाचे शूज असे वर्णन आहे. सदर महिला व मुलगा सापडल्यास अकोले पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले.

Web Title: married woman went missing with two small children

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here