Home संगमनेर संगमनेर: सलून मालकाने दिली महिलेविरोधात जातीवाचक शिवीगाळीचा आरोप, महिलेचा विनयभंग

संगमनेर: सलून मालकाने दिली महिलेविरोधात जातीवाचक शिवीगाळीचा आरोप, महिलेचा विनयभंग

Breaking News | Sangamner:  सलून चालकाला महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना.

Salon owner accused of caste abuse, molestation of woman

संगमनेर : सलून चालकाला महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी (दि.०९) दुपारी ३:३० ते ४:१५ वाजेच्या सुमारास शहरातील एका सलूनमध्ये घडली होती. या प्रकरणी शनिवारी (दि.१३) सलून चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सलूनमध्ये केसांना हेअर स्पा करण्यासाठी गेलेल्या याच महिलेचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी देखील संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

नाशिक येथील मूळ रहिवासी असलेल्या २६ वर्षीय सलून चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला सलूनमध्ये जाऊन सलूनची बदनामी करून ते बंद पाडण्यासाठी सलूनमधील कर्मचारी शाकिब याला स्वतःहून बोलावून घेऊन हेअर वॉश करण्यास सांगून वॉश चालू असताना त्याच्याशी जाणून बुजून वाद घालून त्याला चुकीच्या पद्धतीने बोलली. त्याला हाताने मारहाण करून तिने जोरजोरात आरडाओरडा केली, त्यावेळी सलून चालक तिला समजावून सांगत असताना तिने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. असेही फिर्यादीत म्हटले आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले,   या प्रकरणी दोन गुन्हे दाखल असून पहिली फिर्याद महिलेने दिली आहे, त्यानंतर चार दिवसांनी सलून चालकाने फिर्याद दिली. मंगळवारी ही महिला सलूनमध्ये केसांना हेअर स्पा करण्यासाठी गेली होती. सलूनमध्ये काम करणारा शाकिब नावाचा मुलगा (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) हा हेअर स्पा करण्यासाठी आला.  त्याने तिच्या केसांना हेअर स्पा करण्यास सुरुवात केली. लगेचच त्याने मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता, असे म्हणत तिच्या शरीरावरील टॅटू संदर्भाने तिच्याकडे विचारणा केली. महिलेशी चुकीचे वर्तन करत त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. असे त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते.

Web Title: Salon owner accused of caste abuse, molestation of woman

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here