Home औरंगाबाद सोशल मीडियावर मैत्री, हॉटेलात नेऊन तरुणीवर अत्याचार

सोशल मीडियावर मैत्री, हॉटेलात नेऊन तरुणीवर अत्याचार

Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: जेवणातून गुंगीचे औषध देऊन हॉटेलात नेलं. तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.

Friendship on social media, abuse of a young woman by taking her to a hotel

छत्रपती संभाजीनगर: नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीशी एकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री केली. त्यानंतर तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन हॉटेलात नेलं. तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीकांत तेजराव लहाने (रा.भानुदास नगर) असे आरोपीचे नाव आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाटच आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी ही शहरात नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आली होती. ती क्रांतीचौक परिसरात राहत होती. यावेळी पीडितेची आरोपीसोबत सोशल मीडियावरुन ओळख झाली.  दोघांचेही अधून मधून बोलणे सुरू झाले. १० मार्च २०२३ रोजी सायंकाळी पीडित तरुणीच्या मेसला सुट्टी होती. यावेळी आरोपीने तुला माझ्या घरून डबा आणून देतो असं पीडितेला सांगितलं. पीडितेने होकार देताच आरोपीने जेवणाच्या डब्यात गुंगीचे औषध टाकले. जेवण केल्यानंतर पीडितेला चक्कर आल्याने बाहेर फिरण्याच्या बहाण्याने आरोपीने तरुणीला पडेगाव येथील एका हॉटेलात नेलं. तिथे आरोपीने तरुणीवर वारंवार अत्याचार केला. याशिवाय तरुणीचे आक्षेपार्य छायाचित्रे काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारुन टाकेन अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली.

तू माझ्यावर केस केली तरी माझ काहीच वाकडे होणार नाही. कारण माझी बहीण एका बड्या मंत्र्याच्या घरी दिलेली आहे. ते मला वाचवतील, असा सज्जड दमही आरोपीने पीडितेला दिला. या घटनेनंतर पीडित तरुणी मानसिक तणावात गेली. तिने घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी हा तरुणीला ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार करीत होता. अखेर वेदना असह्य झाल्याने पीडित तरुणीने थेट छावणी पोलीस ठाणे गाठत आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Friendship on social media, abuse of a young woman by taking her to a hotel

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here