Home क्राईम खळबळजनक! पती-पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

खळबळजनक! पती-पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात

Breaking News | Baramati Crime: धक्कादायक घटना,  पती-पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे.

dead body of the husband and wife in a pool of blood

बारामती : शहरातील जामदार रोडवरील खत्री पवार इस्टेटनजीक पती-पत्नीचा मृतदेह आज रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर बारामतीत खळबळ उडाली. सचिन महालिंग वाघोलीकर व सारिका सचिन वाघोलीकर असे या पती-पत्नीचे नाव असून या दोघांचाही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाक घरात आढळून आला. दोघांच्याही अंगावर वार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाघोलीकर दांपत्यास दोन मुले व एक मुलगी असून ते तिघेही घटना घडली त्यावेळेस घरात नव्हते अशी माहिती पोलिसांनी दिली.

सचिन यांचा मित्र त्यांना भेटण्यासाठी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: dead body of the husband and wife in a pool of blood

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here